Pune : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नि: शुल्क मार्गदर्शक शिबीर

एमपीसी न्यूज : सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या (Pune) पालकांसाठी फिटजी पुणे सेंटर यांच्या तर्फे ऑनलाइन मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर मंगळवार 28 मार्च रोजी संध्याकाळी 5.30 वाजता होणार आहे. या ऑनलाइन सत्रात भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. इच्छुक विद्यार्थी आणि पालक सत्रासाठी http://tinyurl.com/fpcguidance10 येथे ऑनलाइन नोंदणी करू शकतात.

Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

फिटजीचे तज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांची शक्ती, आवड आणि गुणांच्या आधारावर पसंतीचे स्ट्रीम निवडण्यासाठी मार्गदर्शन करतील. विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, चिकित्सा, कला आणि वाणिज्य याबद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले जाईल. सुरुवातीच्या तयारीचे फायदे व इतर महत्वपूर्ण विषयांवर यावेळी माहिती दिली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.