Pune : पुणे, पिंपरी-चिंचवड पोलिसांना ‘पीएमपीएमएल’चा मोफत प्रवास

एमपीसी न्यूज – पुणे शहर पोलीस आयुक्तालय आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कर्तव्यार्थ पोलिसांना पीएमपीएमएलने मोफत प्रवासासाठी मान्यता दिली आहे. दोन्ही आयुक्तालयातील पोलीस विनातिकीट प्रवास करू शकणार आहेत. याबाबतच्या सूचना पीएमपीएमएल प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र, यामध्ये पुणे ग्रामीण, लोहमार्ग, एसआरपी, होमगार्ड आणि अन्य पोलिसांना मोफत प्रवास करता येणार नाही.

पुणे महानगर परिवहन महामंडळाने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पोलिसांना पीएमपीएमएल बसमधून विनातिकीट प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याबाबतचे आदेश पीएमपीएमएलचे तिकीट तपासणीस, पर्यवेक्षकीय सेवक आणि सर्व वाहकांना देण्यात आले आहेत. मोफत प्रवासाची सवलत केवळ पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर काम करणा-या पोलिसांनाच मिळणार आहे. पोलिसांच्या ओळखपत्राची तपासणी करून विनातिकीट कर्तव्यार्थ प्रवास करता येणार आहे.

  • या सवलतीमधून पुणे ग्रामीण पोलीस, लोहमार्ग (रेल्वे) पोलीस, राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ), होमगार्ड व अन्य पोलिसांना ही सवलत देण्यात आलेली नाही. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलिसांव्यतिरिक्त अन्य पोलीस विनातिकीट प्रवास करताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.