Pune crime : म्हशीने घरासमोर घाण केल्याने, दोन कुटुंबीयात फ्री स्टाइल हाणामारी

एमपीसी न्यूज : म्हशीने घरासमोर घाण केल्यानंतर झालेल्या वादातून दोन कुटुंबीयांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.(Pune crime) बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आरटीओ जवळील काचीवस्तीत हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन्ही कुटुंबीयांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या असून पाच ते सहा जणांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शैलेश रमेश काची (वय 37) आणि हर्षल जनार्दन मल्हार (वय 43) या दोघांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही शेजारी शेजारी राहतात.(Pune crime) यातील शैलेश काची यांची महेश हर्षल मल्हार यांच्या घरासमोर येऊन घाण करू लागल्याने फिर्यादी यांनी ‘अरे ही म्हैस कोणाची आहे आमचे घरासमोर घाण करीत आहे” याचा राग आल्याने फिर्यादी आणि आरोपी यांचे कुटुंबीय एकमेकांना भेटले. त्यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी देखील झाली.

Pune murder : हडपसर येथे किरकोळ भांडणातून रिक्षा चालकाचा खून

पोलीस ठाण्यात या दोन्ही कुटुंबीयांनी एकमेकांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.