Pune : गणेश मंडळांतर्फे पूलवामा हल्ल्यातील जवानांना श्रध्दांजली

एमपीसी न्यूज – ‘भारत माता की जय… जय हिंद’ अशा घोषणा देत जम्मू-काश्मीरच्या पूलवामा येथील मातृभूमीचे रक्षण करणा-या सीआरपीएफ जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा जय गणेश व्यासपीठ आणि पुण्यातील गणेशोत्सव मंडळांतर्फे जाहीर निषेध करण्यात आला. तसेच यावेळी भारतीय लष्कराच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहू, अशाप्रकारची शपथ देखील घेण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर पुण्यातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आदरांजली अर्पण केली. परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, विश्रामबाग विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे, नावंदे, फोर्स १चे जवान, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्टचे अशोक गोडसे यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

  • श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ, कसबा गणपती ट्रस्ट, तांबडी जोगेश्वरी मंडळ, गुरुजी तालीम मंडळ, तुळशीबाग मंडळ, ढोल ताशा महासंघ, सैनिक मित्र परिवार, सेवा मित्र मंडळ ट्रस्ट, साईनाथ मंडळ ट्रस्ट, साखळीपीर मंडळ, काळभैरवनाथ मंडळ, विंचुरकर वाडा मित्र मंडळ आदी मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.