Pune : शहरातील ‘या’ भागात 3 मेच्या मध्यरात्रीपर्यंत मनाई आदेश; फक्त दूध आणि औषधे मिळणार

किराणा माल, भाजीपाला व फळे, चिकन, मटन,अंडी विक्री केंद्र,  तसेच इतर वितरण सेवा पूर्णपणे बंद राहणार

एमपीसी न्यूज ; करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शहरातील दहा पोलिस ठाण्यांच्याहद्दीत ३ मेच्या मध्यरात्री १२ पर्यंत पूर्णपणे मनाई आदेश लागू केले आहेत. या काळात या ठिकाणी सकाळी दहा ते दुपारी १२ पर्यंत या वेळेत दूध विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर या प्रतिबंधीत क्षेत्रामधील किराणा माल, भाजीपाला व फळे, चिकन, मटन,अंडी आदी विक्री केंद्र,  दुकाने तसेच इतर वितरण सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत.

पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी हे मनाई आदेश काढले आहेत. त्यानुसार परिमंडळ एक, दोन तीन आणि चारच्या हद्दीतील भागात औषधे आणि दूध वगळता सर्व प्रकारच्या साहित्यांची विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये दुधाच्या वाहतुकीवर बंधन घालण्यात आलेले नाही. त्यामुळे सकाळी सहा ते दहा या वेळेत घरपोच दूध विक्री सेवा सुरु रहाणार आहे. तसेच अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून धान्य वितरित करण्यास मनाई करण्यात आलेली नाही. या प्रतिबंधीत क्षेत्रामधील किराणा माल, भाजीपाला व फळे, चिकन, मटन,अंडी आदी विक्री केंद्र, दुकाने तसेच इतर वितरण सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत.

पोलिसांनी प्रतिबंधित केलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे

परिमंडळ एक : समर्थ, खडक आणि फरासखाना पोलिस ठाण्याच्या अखत्यारित येत असलेला संपूर्ण परिसर.

परिमंडळ दोन : स्वारगेट पोलिस ठाणे – गुलटेकडी, महर्षीनगर, डायसप्लॉट, इंदिरानगर, खड्डा झोपडपट्टी, लष्कर पोलिस ठाणे- नवीन मोदीखाना, पूना कॉलेज रस्ता, मोदीखाना कुरेशी मशिदीजवळचा परिसर, भीमपुरा गल्ली, बाबाजान दर्गा, क्वाटरगेट रस्ता, शिवाजी मार्केट, सरबतवाला चौक रस्ता, शितळादेवी मंदिर रस्ता, बंडगार्डन पोलिस ठाणे- ताडीवाला रस्ता, सहकारनगर पोलिस ठाणे- तळजाई वसाहत, बालाजीनगर.

परिमंडळ तीन : दत्तवाडी पोलिस ठाणे- पर्वती दर्शन परिसर.

परिमंडळ चार : येरवडा पोलिस ठाणे-लक्ष्मीनगर, गाडीतळ, चित्राचौक परिसर, खडकी पोलिस ठाणे- पाटील इस्टेट झोपडपट्टी, इराणी वस्ती पाटकर प्लॉट.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.