Pune Fruit Price : मागणी व पुरवठ्यातील समतोलामुळे फळांचे भाव स्थिर

एमपीसी न्यूज – मागणी व पुरवठा यातील समतोलामुळे कलिंगड आणि मोसंबी वगळता सर्व फळांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. आवक घटल्याने कलिंगडाच्या भावात घाऊक बाजारात किलोमागे ५ रुपयांनी तर, मोसंबीच्या भावात किंचितशी वाढ झाली आहे.

पाऊस व तेल्यामुळे नुकसान झाल्याने आवक घटून डाळिंबाच्या भावातील तेजी कायम आहे. लिंबाचा नवीन बहार सुरू झाला आहे. त्यामुळे हिरव्या लिंबुचे अधिक प्रमाणात बाजारात येत आहे. त्यामुळे लिंबाला नेहमीच्या तुलनेत कमी मागणी आहे.

रविवारी येथील बाजारात केरळ येथून अननस ३ ट्रक, मोसंबी ६० ते ६५ टन, संत्री २० ते २५ टन, डाळिंब ६० ते ७० टन, पपई २५ ते ३० टेम्पो, लिंबे अडीच ते तीन हजार गोणी, चिक्कू १ हजार बॉक्स क्रेट्स, कलिंगड ५ ते ६ टेम्पो, सिताफळ २० ते २५ टन आणि खरबुजाची ४ ते ५ टेम्पो आवक झाली.

_MPC_DIR_MPU_II

फळांचे पुढीलप्रमाणे :
लिंबं (प्रति गोणी) : १५०-३००, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : (३ डझन) : १२०-३००, (४ डझन ) : ४५-१२०, संत्रा : (१० किलो) : १००-५००, डाळींब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१५०, गणेश : ५-२५, आरक्ता १०-६०. कलिंगड : १०-२५, खरबुज : १०-३०, पपई : ५-२०, चिक्कू : १००-७००, सिताफळ ५-१२०.

फुलांची साधारण आवक :
मार्केटयार्डातील घाऊक फुलबाजारात सध्यस्थितीत सर्व फुलांची साधारण आवक होत आहे. गेल्या आठवड्यात काही दिवस आवक घटल्याने फुलांच्या भावत दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली होती. फुलांना चांगले भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात फुले बाजारात आणण्यास सुरवात केली. त्यामुळे, भावात घसरण होऊन फुलांचे घटलेले भाव पूर्वपदावर आलेले आहेत.

अधिक मास सुरू असल्याने फुलांना मागणी कमी प्रमाणात होत आहे. राज्यसरकारने सोमवार (दि. 4) पासून रेस्टॉरंट खुली करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे, कटफ्लॉवरच्या मागणीत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याचे व्यापारी अनुराज कामठे यांनी सांगितले. तसेच, शहरासह राज्यातील अन्य मंदिरे उघडल्यास फुलांच्या मागणीत वाढ होईल. त्यानंतर भावात सुधारणा होईल, अशी शक्यताही यावेळी वर्तविण्यात आली.

फुलांचे प्रतिकिलोचे दर :
झेंडू : 10-20, गुलछडी : 20-50, बिजली 10-30, अष्टर : जुडी 10-16, सुट्टा 40-60, कापरी : 10-30, शेवंती : 40-80, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : 10-15, गुलछडी काडी : 5-20, डच गुलाब (20 नग) : 30-60, लिलि बंडल : 5-8, जर्बेरा : 10-30.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.