Pune : खुनाचा प्रयत्न केलेल्या फरार आरोपींना पिस्टलसह अटक

एमपीसी न्यूज –  खुनाचा प्रयत्न केलेल्या आरोपीला पिस्टल  व त्याच्या दोन साथादारांसह (Pune ) अटक कऱण्यात आली आहे. ही कारवाई पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पय़क 1 यांनी मंगळवारी (दि.6) केली आहे.

ओंकार उर्फ तानाजी लोखरे (वय 19 रा.धायरी, पुणे), आकाश उर्फ सोन्या गणपत भिकुले (वय 24 रा.महादेवनगर, पुणे) व राधेमोहन उर्फ मुन्ना सिताराम पिसे (वय 19 रा.वारजे माळवाडी, पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्त घालत असताना पोलीस अमंलदार किरण ठवरे व आवाड यांना त्यांच्या बातमीदारामार्फत  बातमी मिळाली की, एक सराईत हा शस्त्रासह रेल्वेने मध्यरात्री परगावी जाणार आहे. त्यानुसार खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा एकचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाने पुण्यातील मालधक्का चौकाकडे जाणाऱ्या रोडवरील रेल्वे रुग्णालयाच्या समोर सापळा लावला व तीन संशयीतांना ताब्यात घेतले.

आरोपींची अंग झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन देशी बनावटीचे पिस्टल व 4 जिवंत काडतुसे, 1 लोखंडी कोयता एसा एकूण 80 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Maval : राष्ट्रवादीने पुण्यावर दावा केल्यानंतर काँग्रेसचा मावळवर दावा

पोलीस तपासात आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून ओकांर लोखरे याच्यावर 11 गुन्हे असून तो सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी होता. आकाशवर ही पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रत्नाचा गुन्हा आहे तर राधेमोहन याच्यावरही विविध पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत. आरोपींवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा एकचे पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव हे पुढील तपास  (Pune ) करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.