Pune : जंगली महाराज मंदिर विकासासाठी निधी त्वरित वितरीत व्हावा – सिद्धार्थ शिरोळे

एमपीसी न्यूज : असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान (Pune) असलेल्या श्री सद्गुरू जंगली महाराज मंदिराच्या विकासासाठी सरकारने निधी मंजूर केला आहे, तो त्वरीत मिळावा आणि विकासकामे सुरू व्हावीत, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज (शुक्रवारी) केली.

पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत शिवाजीनगर येथील श्री सद्गुरू जंगली महाराज मंदिराच्या विकासाचा मुद्दा आमदार शिरोळे यांनी उपस्थित केला. मंदिर परिसर आणि तेथील पाणीपुरवठ्यात सुधारणा व्हावी, सुशोभीकरण व्हावे यासाठी आमदार शिरोळे यांनी यापूर्वीही हे विषय (Pune) मांडले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पहाणीही केली. त्या अनुषंगाने नियोजन समितीच्या बैठकीत बोलताना शिरोळे म्हणाले, मंदिरासाठीचा निधी लवकरात लवकर वितरीत करण्यात यावा. त्यामुळे मंदिराच्या विकासकामाला वेगाने चालना मिळेल.

Pune News : अभिरुची संपन्न हिंदी चित्रपट संगीत सर्वसमावेशक – प्रा. विनय हर्डीकर

त्याचप्रमाणे पुणे महापालिकेस सन २०२२-२३ साठी जिल्हा नियोजन समितीकडून मिळणाऱ्या निधीतून पुणे पोलीस वाहतूक शाखेकरिता अत्याधुनिक, सुसज्ज साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी बैठकीत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.