Pune : कोरोनाच्या 297 मृतदेहांवर महापालिका कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार

Funeral on 297 bodies of Corona by municipal employees

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. 300 पेक्षा जास्त रुग्णांचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 297 जणांचे मृतदेह महापालिकेने उचलले आहेत, तसेच या मृतदेहांवर अंत्यसंस्कारही केले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर जवळचे नातेवाईक मृतदेहाला हात लावायला तयार होत नाहीत. त्यामुळे महापालिकेचे कर्मचारी जीवावर उदार होऊन हे मृतदेह उचलत आहेत. आतापर्यंत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाचे तब्बल 297 बाधितांचे मृतदेह उचलले आहेत.

शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असून त्याचा मृत्युदर 5 टक्के आहे. हा मृत्युदर वाढू नये याकरिता महापालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक मृतदेह घेण्यास येत नाहीत.

अंत्यविधी करण्यासाठी महापालिकेवरच जबाबदारी टाकतात. त्यामुळे मृतदेह उचलण्याची व अत्यंविधी करण्याची जबाबदारी पुणे महापालिका कर्मचाऱ्यांवर येते.

महापालिका कर्मचाऱ्यांनी 297 कोरोनाबधितांचे मृतदेह स्मशानभूमीत पोचविणे, अत्यंविधी करणे, अशी कामे केली आहेत. यासोबतच ३ बेवारस मृतदेह व एका निगेटिव्ह रुग्णाचाही मृतदेह महापालिका कर्मचाऱ्यांनी उचलत अंत्यसंस्कार केले.

दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी सोमवारी केवळ 57 नव्या रुग्णांची नोंद होऊन 6 जणांचा या रोगामुळे मृत्यू झाला. 174 क्रिटिकल रुग्ण असून, 46 जण व्हेंटिलेटरवर आहेत. शहरात आता कोरोनाचे 6 हजार 529 रुग्ण झाले आहेत.

आतापर्यंत पुण्यात कोरोनामुळे 320 जणांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त मधुमेह, किडनी, हृदयाचा विकार, लठ्ठपणा, असे अनेक आजार होते. मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये जेष्ठ नागरिकांचे प्रमाण मोठे आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.