Pune : रेल्वे फाटक उघडण्यास वेळ लागला म्हणून गेटमनला लाथाबुक्क्यांनी मारहाण

एमपीसी न्यूज : रेल्वे फाटक उघडण्यास वेळ लागला म्हणून गेटमनला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना काल सोमवारी (दि.24) रात्री सव्वाएकच्या सुमारास ए.ए.रेल्वे बोपोडी फाटक येथे घडली.

याप्रकरणी संतोष खिलारे (वय 27, रा.बोपोडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष खिलारे हे बोपोडी येथील रेल्वे गेटवर रात्री उशिरा कर्तव्यावर होते. दरम्यान त्यांच्याजवळ दोघेजण आले आणि त्यांनी संतोष यांना , फाटक उघडायला एवढा वेळ लागतो का ? असे बोलून शिविगाळ केली. एवढेच नाही तर त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या हातातली टॉर्च हिसकावली आणि संतोष यांच्या डोक्यात घालून त्यांना जखमी केले . याप्रकरणी दोन अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खडकी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.