Pune : मटका क्वीनला अटक, व्हाट्सअपवर घ्यायची मटका

Gambling Queen arrested for gambling on Whats App अधिक चौकशी केली असता तिच्या मालकाचे नाव पठाण भाऊ आहे असे सांगितले.

एमपीसी​ न्यूज -​ व्हाट्सअप वर मटका घेणाऱ्या एका मटका किंग महिलेला ताडीवाला रोड परिसरातून बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. रेश्मा प्रताप डोगरा (वय 40) असे या महिलेचे नाव आहे. बंडगार्डन पोलिसात तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ताडीवाला रोड परिसरातील एक महिला मोबाईलवर व्हाट्सअपच्या सहाय्याने मटका घेत असल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी या परिसरात गुरुवारी सायंकाळी जाऊन छापा मारला असता ही महिला मटका घेत असताना आढळून आली. यानंतर महिला पोलिसांनी पंचासमक्ष या महिलेची अंगझडती घेतली असता रोख पाच हजार तीनशे रुपये आणि आणि मटका घेण्याचे साहित्य सापडले.

त्यानंतर पोलिसांनी या महिलेला अटक करून तिच्याकडे अधिक चौकशी केली असता तिच्या मालकाचे नाव पठाण भाऊ आहे असे सांगितले. तसेच त्याच्या सांगण्यावरून व्हाट्सअप वर मटका घेत असल्याचे सांगितले. अधिक तपास बंडगार्डन पोलिस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.