Pune: भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश भेगडे यांची फेरनिवड

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी तळेगांवचे गणेश भेगडे यांची आज (मंगळवारी) फेरनिवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष पदासाठी भेगडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी आमदार सुजीतसिंह ठाकूर यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.

भारतीय जनता पार्टीच्या पक्षांतर्गत निवडणुका सुरू आहेत. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार दिगंबर भेगडे, जालिंदर कामठे, प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले, महिला जिल्हाध्यक्ष क्रांतीताई सोमवंशी, तळेगावच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, राजगुरूनगरचे नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, मावळ पंचायत समितीच्या सभापती निकिता घोटकुले, मावळ तालुका भाजपाचे अध्यक्ष रवींद्र भेगडे, शहराध्यक्ष संतोष दाभाडे, बाळासाहेब नेवाळे, डॉ. ताराचंद कराळे, संतोष तांबे, संतोष पाचंगे, बाळासाहेब गरुड, सचिन सदावर्ते, अविनाश मोटे, गणेश बुट्टे, नानासाहेब शेंडे, यांच्यासह मंडल पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाध्यक्षपदासाठी गणेश भेगडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. अर्जावर डॉ. ताराचंद कराळे सूचक तर अनुमोदक म्हणून विनायक ठोंबरे हे होते. एकच अर्ज आल्याने आमदार ठाकूर यांनी भेगडे यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. दरम्यान, तत्कालीन जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी गणेश भेगडे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. आज पुन्हा त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

सचिन सदावर्ते यांनी संघटन विषयक माहिती दिली. स्वागत धर्मेंद्र खांडरे यांनी केले. तर, अविनाश बवरे यांनी सूत्रसंचालन केले.

HB_POST_END_FTR-A2
You might also like