BNR-HDR-TOP-Mobile

Pune : दिव्यांग व सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक  श्री गणेश मूर्ती कार्यशाळा

'पुणे टीचर ऍक्टिव्हिटी ग्रुप ' चा पुढाकार

एमपीसी न्यूज -‘पुणे टीचर ऍक्टिव्हिटी ग्रुप तर्फे ‘दिव्यांग व सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक  श्री गणेश मूर्ती तयार करण्याचा उपक्रम  रविवारी आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रम उदघाटन नगरसेवक युवराज बेलदरे,अर्चना शहा, लायन विनय निंबाळकर, लायन सचिन कर्णिक, मोहन दुधाने,गिरीश लिमन यांच्या हस्ते झाले.

हा उपक्रम नारायणी धाम मंदिर,कात्रज,पुणे, येथे घेण्यात आला. यामध्ये धनकवडी, बालाजीनगर, कात्रज, आंबेगाव परिसरातील एकूण 200 विद्यार्थी व पालक सहभागी झाले.यासाठी झाँसी राव यांनी मार्गदर्शन केले.  या उपक्रमासाठी लागणारी  शाडू माती म्हाळू पार्वती प्रतिष्ठान निलेश निकम यांच्या तर्फे मोफत उपलब्ध करण्यात आली .

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आरती लिमन, दैवत लिमन,अशोक नांगरे, रवींद्र जोशी, हेमंत यादव, अजय बोऱ्हाडे, प्रशांत गडदे, संजय पाटील, मेघना जोशी, पूजा गयावळ, इनामदार, चित्रा शिंदे, सुषमा सोनवले या शिक्षकांनी सहकार्य केले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like