Pune News : गणेश जयंतीनिमित्त उद्या पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल

एमपीसी न्यूज : श्री गणेश जयंतीनिमित्त पुण्यातील मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बुधवारी (25 जानेवारी) वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. (Pune News) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. शिवाजीनगर भागातील स. गो. बर्वे चौकातून शिवाजी रस्त्याकडे जाणारी जड वाहतूक (पीएमपी बस सेवा) बंद करण्यात येणार आहे.

श्री गणेश जयंतीनिमित्त विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी मानाच्या मंडळांकडून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामुळे बाजीराव रस्त्याने महापालिकेकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

वाहनचालकांनी पूरम चौकातून टिळक रस्ता, अलका चित्रपटगृह, खंडोजीबाबा चौक या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.(Pune News) मध्यभागातील वाहतुकीची परिस्थिती विचारात घेऊन शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, गणेश रस्ता, लक्ष्मी रस्ता तसेच अन्य मार्गांवरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे.

PMPML News : पीएमपीएमएल वाहकाचा असाही विक्रम; एका दिवसात आणले तब्बल 20 हजारांचे उत्पन्न

यामध्ये केवळ रुग्णवाहिका, पोलीस व अग्निशमनदल अशा अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली असून इतर सर्व वाहनांना सकाळी सहा पासून मार्गावर प्रवेश बंद असणार आहे. त्यासाठी पर्यायी वाहतूक पुढील प्रमाणे

1)  स.गो.बर्वे चौक येथून शिवाजी रोडने स्वार्गेटकडे जाणाऱ्या सर्व जड वाहनांना वाहतूकीस बंदी असून केवळ पीएमपीएलच्या बसेस ना सूट देण्यात आली आहे.

2)  प्रिमीयर गॅरेज चौक  ते (मंगला थिअटर समोरून) नागदेव ऑईल डेपो चौक दरम्यान तात्पुर्त्या स्वरूपात नो पार्किंग

पीएमपीएमएल बस चे मार्ग –

1)पुणे मनपा येथील वर्तुळाकार बस मार्ग प्रिमीयर गॅरेज चीक, मंगला थिएटर समोरून उजवीकडे वळून खुडे चौक, उजवीकडे वळून पुणे मनपा कोर्ट कॉर्नर, प्रिमीयर गॅरेज चौक असा वर्तुळाकार वाहतूक मार्ग असेल.

2)स. गो. बर्वे चौकातून छत्रपती श्री. शिवाजी महाराज रोडने स्वारगेट कडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसेस प्रिमीयर गॅरेज चौकातून डावीकडे वळून मंगला थिएटर समोरुन पुढे उजवीकडे वळून खुडे चौक, बालगंधर्व चौक, डावीकडे वळून खंडोजीबाबा चौक, अलका टॉकीज चौक, टिळक रोडने पुरम चौक मार्गे जातील.

3) स. गो. बर्वे चौकातून छत्रपती श्री. शिवाजी महाराज रोडने पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या बसेस प्रिमीयर गॅरेज चौकातून डावीकडे वळून मंगला थिएटर समोरून पुढे डावीकडे वळुन राष्ट्रवादी काँग्रेस भवन उजवीकडे वळून कुंभारवेस चौक डावीकडे वळून शाहिर अमर शेख चौक मार्गे जातील. कोथरुडकडुन येणाऱ्या व अप्पा बळवंत चौक मार्गे पुणे स्टेशनकडे जाणान्या बसेस बाजीराव रोडने गाडगीळ पुतळा चौक उजवीकडे वळून कुंभार वेस चौक मार्गे पुणे स्टेशनकडे जातील.

* इतर दुचाकी व हलक्या चारचाकी वाहनांकरीता वाहतूक डायव्हर्जन

  • प्रिमिअर गॅरेज चौकातून डावीकडे वळुन मंगला थिएटर समोरुन जाणाऱ्या रस्त्यावरील (पीएमपीएमएल बसेस खेरीज) पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्ग सदरची वाहने स. गो. बर्वे चौकातून सरळ जंगली महाराज रोडने बालंगपर्व चौकातून डावीकडे वळून इच्छित स्थळी जातील.

जिजामाता चौकातून छत्रपती श्री. शिवाजी महाराज रोडने स्वारगेटकडे जाण्याकरीता पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा.

पर्यायी मार्ग

1) जिजामाता चौक डावीकडे वळून गणेश रोडने फडके हौद चौक, देवजी बाबा चौक, उजवीकडे वळून हमजेखान चौक सरळ महाराणा प्रताप रोडने किंवा उजवीकडे वळून लक्ष्मी रोडने सोन्या मारुती चौक,बेलबाग चौक, डावीकडे वळून शिवाजी रोडने इच्छितस्थळी जातील.

2) शिवाजी पुलावरून गाडगीळ पुतळा चौक, डावीकडे वळून कुंभार वेस चौक, शाहिर अमर शेख चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.

3) शिवाजी पुलावरून गाडगीळ पुतळा चौक मार्गे फडके हौद चौकाकडे जाताना (प्रेमळ विठोबा मंदिराकडे जाणारा रस्ता वगळून) वाहने जिजामाता चौकातूनच डावीकडे वळून जातील.

* अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारी सर्व वाहतूक पर्यायी मार्गातून वळविण्यात येत आहे. पर्यायी मार्ग : सदरची वाहने अप्पा बळवंत चौक, बाजीराव रोडने इच्छित स्थळी जातील,

बाजीराव रोडने सायंकाळी महत्वाच्या व मानाच्या गणपतींच्या गिरवणुका सुरू झाल्यानंतर आवश्यकतेप्रमाणे पुरम चौकातून बाजीराव रोडने मनपाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार इतर मार्गावर वळविण्यात येत आहे. > पर्यायी मार्ग :- सदरची वाहने पुरम चौकातून टिळक रोडने अलका टॉकीज चौक, खंडोजीबाबा चौक मार्गे तस्थळी जातील.

* मानाचे गणपतींच्या मिरवणुकीच्या अनुषंगाने तसेच शहराचे मध्यवर्ती भागातील वाहतुकीची परिस्थिती पाहून शिवाजी रोड, बाजीराव रोड, गणेश रोड, लक्ष्मी रोड व इतर मिरवणुक मार्गावरील अंतर्गत वाहतूकीत आवश्यकतेप्रमाणे बदल करण्यात येतील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.