Ganpati Darshan Yatra : ज्येष्ठ नागरिकांची मोफत गणपती दर्शन यात्रा

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभाग व पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या उपक्रमांतर्गत आज (Ganpati Darshan Yatra) (दि.2) पिंपरी-चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी पुण्यातील गणेश मंडळांचे मोफत दर्शन घेतले.

यावेळी सुधिर कुलकर्णी ,सुजाता कुलकर्णी ,औदुंबर नाईक ,रसिका नाईक ,गोविंद देशपांडे, दगडू मूढविकर,कृष्णा देशपांडे,सुनिता देशपांडे,जयंत देशपांडे,शशिकांत जुन्नरे ,सुरेंद्र अवचट,सुषमा अवचट, वासंती पिटके,वसंत पिटके,अभिमन्यु भारसाकडे,प्रविण भागवत,सुप्रिया गद्रे,अनिल कुलकर्णी ,नीलकंठ कुलकर्णी,संध्या कुलकर्णी,सोपान साबळे,उद्धव गोसावी ,सुप्रिया गोसावी,सदानंद मेढेकर,(Ganpati Darshan Yatra) श्रद्धा सदानंद मेढेकर, सपना पुजारी, महान्ताय्य पुजारी, ललिता दाउदखाणे, श्रीकांत दाउदखाणे, सुवर्ण साखरे,सतीश साखरे,अदिती मारगावकर, अश्विनी नाटेकर,ओमकार वाठारकर,अंजली वाठारकर,शंकर देशपांडे,अशोक मुळजे,लक्ष्मी सोलकर, बाबाजी सोलकर, संध्या मुळजे,प्रकाश कवलगीकर,प्रकाश व्यवहारे,माधुरी व्यवहारे,आरती कुलकर्णी,वंदना कुलकर्णी, शामल जुन्नरे यांनी या बसचा लाभ घेतला.

Talegaon Dabhade : ऋषिपंचमी निमित्त सामूहिक महिला अथर्वशीर्ष पठण

पीएमपीएमएलच्या एकूण तीन गाड्या आज पिंपरी व निगडी पीएमपीएमएल आगारातून सुटल्या. यावेळी 60 वर्षा पुढील नागरिकांनी याचा लाभ घेतला.(Ganpati Darshan Yatra) सकाळी सात वाजता या बस सुटल्या यावेळी दगडूशेठ, कसबा, तुळशीबाग, गुरूजी तालीम, तांबडी जोगेश्वरी, रंगारी वाडा आणि केसरीवाडा या गणपतीचे दर्शन घेऊन दुपारी बारापर्य़ंत बस परत आली. यावेळी नागरिकांना, अल्पोपहार व पाणी, शौचालय थांबा, टूर गाईड, आरोग्यसेवक इत्यादी सुविधा दिल्या गेल्या. दुपारी बारा वाजता या बसेस पुन्हा पिंपरी व निगडी आगारात दाखल झाल्या.

 

 

 

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.