BNR-HDR-TOP-Mobile

Pune : ‘ओम नमस्ते गणपतये…..’ सामूहिक अथर्वशीर्ष पठणाने घुमला, दगडूशेठ हलवाई गणपती परिसर (व्हिडिओ)

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- एमपीसी न्यूज : दरवर्षीप्रमाणे यंदा देखील दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आज सकाळी हजारो महिलांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळातर्फे गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ऋषी पंचमीच्या दिवशी सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन केले जाते. हजारो महिलांनी एका सुरामध्ये म्हटलेल्या सामूहिक अथर्वशीर्ष पठणाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

दरवर्षीप्रमाणे यंदाही अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शंख निनादाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गेली 30 वर्षे सुरू असलेल्या या अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमाचे यंदा 31 वे वर्ष आहे. प्रत्येक महिलेला ट्रस्टच्या वतीने उपरणे, बॅच तसेच प्रसाद देण्यात आला. हजारो महिलांच्या उपस्थितीत आणि गणेशाच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. जय गणेश, जय गणेश’च्या घोषणा देत महिला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत होत्या.

HB_POST_END_FTR-A4

.