Pune Ganpati Visarjan 2023 : मानाच्या पाच गणपतींचे उत्साहात विसर्जन

एमपीसी न्यूज : लाडक्या बाप्पाला निरोप (Pune Ganpati Visarjan 2023) देण्यासाठी आलेल्या लाखो पुणेकरांच्या उपस्थितीत मानाचे पाच गणपतींचे ढोल-ताश्यांच्या गजरात विसर्जन करण्यात आले. सकाळी सव्वा दहा वाजता पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपती पारंपरिक पद्धतीने पालखीमध्ये मिरवणूक काढण्यात आली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या हस्ते पुजा करून मिरवणुकीला सुरूवात झाली. दरम्यान, चार वाजण्याच्या सुमारास वरूण राजाने हजेरी लावली. गणरायांच्या भक्तीत लीन होत आणि जोरदार पावसात पुणेकर नागरिकांनी गणरायांला निरोप दिला. गतवर्षी प्रमाणे यंदाही सायंकाळी सातच्या आत मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

Chinchwad : सार्वजनिक मंडळाची मिरवणूक विसर्जन घाटाकडे रवाना

1. मानाचा पहिला कसबा गणपती 10: 15 वाजता मिरवणूक सुरू तर 4:35 वाजता विसर्जन झाले. (Pune Ganpati Visarjan 2023)

2. मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती 11 वाजता मिरवणूक सुरू 5 :10 वाजाता विसर्जन झाले

3. मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती 12 वाजता मिरवणुक सुरू आणि 5.55 वाजता विसर्जन झाले.

4. मानाचा चौथा तुळशीबाग गणपती 1 वाजता मिरवणूक सुरू तर 6.32 वाजता विसर्जन झाले.

5. मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती 2:15 मिरवणूक सुरू तर 6:45 वा विसर्जन झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.