Pune : हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचे निधन

एमपीसी न्यूज- हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर (वय 85) पुण्यात हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील जोशी रूग्णालयात उपचार सुरु होते. होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे मुलगा अभिजित, पत्नी व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर सोमवारी कोल्हापूर येथील पुनवत (ता. शिराळा) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आंदळकर यांच्या निधनामुळे देशभरातील कुस्तीक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

आंदळकर यांनी कुस्तीमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली. 1960 मध्ये हिंदकेसरीची गदा पटकावली. पाकिस्तानी मल्लांबरोबरच्या त्यांच्या कुस्त्या गाजल्या होत्या. 1962 मध्ये जकार्ता येथे झालेल्या अशियायी स्पर्धेत त्यांनी सुपर हेवी गटात ग्रीको रोमन स्टाइलमध्ये सुवर्णपदक तर फ्री स्टाइलमध्ये रौप्यपदक पटकावले. 1964 मध्ये टोकिओ ऑलि​पिंकमध्ये हेवी गटात भारतीय कुस्ती संघाचे नेतृत्व आंदळकर यांनी केले. तिथे त्यांनी चौथ्या फेरीपर्यंत धडक मारली होती. 1964 साली भारत सरकारने त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले होते.

1967 पासून कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीत कुस्ती प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पडली. भारत केसरी रूस्तम-ए- हिंद दादू चौगुले, महाराष्ट्र केसरी चंबा मुत्नाळ, अॅग्नेल निग्रो, महाराष्ट्र केसरी विष्णू जो​शीलकर, संभाजी वरुटे, राष्ट्रकुल सुवर्णपद​ विजेता रामचंद्र सारंग, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील अशी त्यांच्या पट्ठ्यांची नवे सांगता येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.