Pune : महापालिकेची सर्वसाधारण सभा कोरमअभावी तहकूब

एमपीसी न्यूज – कोरम अभावी पुणे महापालिकेची मंगळवारची सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. या सभेसाठी 56 सदस्य संख्या आवश्यक होती. केवळ 33 सदस्य संख्या उपस्थित असल्याने ही सभा 18 मार्च रोजी दुपारी 3 पर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

लोहगाव रस्त्याची विरोधी पक्षांना माहिती हवी होती. प्रत्येक गोष्टीत राजकारण करणे बरोबर नसल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोधी पक्षांना सुनावले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.