Pune : जनसेवा सहकारी बँकेच्या सभासदांना 10 टक्के लाभांश

एमपीसी न्यूज – जनसेवा सहकारी बॅंकेची 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पुणे येथे पार पडली. यावेळी बँक सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.

हडपसर येथील जनसेवा सहकारी बॅंकेच्या कार्यालयात ही सभा पार पडली. यावर्षी बँक सभासदांना 10 टक्के लाभांश देत असल्याचे बॅंकेचे अध्यक्ष सीए प्रदीप जगताप यांनी जाहीर केले.

प्रदीप जगताप म्हणाले, ” बॅंकेची स्वतःची एकूण 22 एटीएम असून रुपये कार्डद्वारे बॅंकेच्या ग्राहकांना अन्य बॅंकाच्या जवळपास 8 लाख 25 हजारपेक्षा अधिक एटीएमद्वारे व्यवहार करता येतात. बॅंकेच्या डेबिट कार्ड मार्फत 10 लाखांहून अधिक ठिकाणी खरेदीची सेवा उपलब्ध आहे. बॅंकेने मोबाईल बॅंकिग सेवा तसेच मिस्ड कॉल्ड अलर्ट ऑर बॅलेन्स, ई कॉम, ग्रीन पीन, इन्स्टा कार्ड आदी सुविधा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. यूपीआय, मोबाईल बॅकिंग विथ बिल पेमेंट इम्पलिमेटेंशनचे कामकाज या वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीने बॅक प्रयत्नशील असून या सुविधा लवकरच उपलब्ध करुन देणार आहेत. तसेच बॅंक नेहमी खातेदारांना बॅकिंग क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करीत असते” असे जगताप म्हणाले.

बॅंकेस सातत्याने अ वर्ग लाभलेला असून सन 2017-2018 च्या झालेल्या वैधानिक लेखा परीक्षणात बॅंकेला अ वर्ग मिळालेला आहे. बॅंकेच्या ठेवी 31 मार्चपर्यंत 1 हजार 796 कोटी व कर्जे 1 हजार 256 रुपये कोटी इतकी आहेत. बॅंकेचा एकूण व्यवसाय 3 हजार 052 कोटी आहे. बॅकिंग क्षेत्रातील सध्याच्या स्पर्धेचा विचार करता बॅंकेने चांगली प्रगती केली असून पुणे जिल्ह्यातील नॉन शेड्युल्ड नागरी सहकारी बॅंकामध्ये जनसेवा बॅंकेने सातत्याने पहिला क्रमांक राखला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.