Pune : शहरात एक तरी मतदारसंघ मिळावा; या आंदोलनाकडे शिवसैनिकांनी फिरविली पाठ

एमपीसी न्यूज – पुणे शहरामध्ये शिवसेनेला एक मतदारसंघ मिळावा. जनतेची कामे करायला शिवसेनेचा आमदार असणे आवश्यक आहे, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाकडे शिवसैनिकांनी पाठ फिरविली.

उमेदवारी मिळविण्यावरून आता शिवसेनेत 2 गट पडल्याची चर्चा सुरू झाली. दुपारी 3 वाजता आंदोलनाची वेळ देण्यात आली होती. या आंदोलनाला काही मोजकीच मंडळी उपस्थित होती. अलका चौक येथे हे आंदोलन करण्यात आले.

शहरात जमावबंदी आहे. त्यामुळे हे कायद्याचे उल्लंघन असल्याचे पोलिसांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर 10 मिनिटांत आंदोलन गुंडाळावे लागले.

‘त्या’ शिवसैनिकला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने घोषणाबाजी
शिवसेनेचे आंदोलन संपलेले असताना अचानक कुलदीप कोंडे यांचे कार्यकर्ते आले. त्यातील एका शिवसैनिकाचा अंगावर कोंडे यांचे नावाचे बॅनर होते. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर शिवसैनिक शिवसेना भवनकडे रवाना झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.