Pune : शहरातील भूयारी मार्गांची अवस्था वाईट, योग्य उपाययोजना करा -मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील सर्वच भूयारी मार्गाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. नगरसेवकांनी त्यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यातील एकूण वास्तव मांडा, काय केले पाहिजे?, त्याअनुषंगाने अहवाल तयार करा. आणि तातडीने काम करा?, असे स्पष्ट आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

कर्वेनगर, स्वारगेट, आळंदी रस्ता, जंगली महाराज रस्त्यावरील भूयारी मार्ग बंद आहेत. 15 वर्षांपूर्वी भूयारी हा मार्ग बांधला होता. त्यावेळी हा रस्ता दुहेरी होता. भूयारी मार्गची देखभाल वॉर्ड ऑफिस करतात. शहरात एकूण भूयारी 15 मार्ग असल्याचे महापालिकेचे प्रकल्प प्रमुख श्रीनिवास बोनाला यांनी सांगितले. स्वारगेटचा भूयारी मार्ग एमएसआरडीसीमार्फत बांधण्यात आला. त्याची रुंदी वाढविणे आवश्यक आहे.

शहरातील सर्वच भूयारी मार्गाबाबत सर्वोपक्षीय नगरसेवकांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत तक्रारी केल्या. भाजपच्या नगरसेविका नीलिमा खाडे, नगरसेवक सम्राट थोरात, महापालिकेतील विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ, माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनीही भुयारी मार्गाबाबत अनेक अडचणी मांडल्या.

जंगली महाराज रस्त्यावरील भूयारी मार्गाचे उदघाटन स्व. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्याला साधारण 15 वर्षे झाल्याची आठवण दिलीप बराटे यांनी सांगितली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.