Pune : श्री ज्ञानेश्वर विद्यालयास सॅनिटरी नॅपकिन मशिन आणि वेंडिग मशिन भेट

एमपीसी न्यूज – कसबा पेठेतील चव्हाण श्रीराम मंदिर येथे बुधवारी श्रीराम जन्मसोहळा पारंपरिक पद्धतीने आणि भक्तीभावाने भक्तिसंगित, कीर्तन अशा अनेक उपक्रमातून ( Pune)  तसेच जहांगीर हॉस्पिटलच्या सहकार्याने नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून साजरा करण्यात आला. याचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला.

 धार्मिक परंपरा जपत मंदीराच्यावतीने रामनवमीचे औचित्य साधून नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच  ज्ञानेश्वर हरपळे (फुरसुंगीकर) यांच्या स्मृती प्रित्यर्थ व श्रीमती पार्वती चव्हाण फाउंडेशन यांच्यावतीने प्रतिभा धंगेकर यांच्या हस्ते आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांच्या कडे श्री ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी देवाची यास सॅनिटरी नॅपकिन मशिन आणि वेंडिग मशिन भेट म्हणून सुपूर्त करण्यात आले.
याप्रसंगी आमदार रवींद्र धंगेकर, पार्वती चव्हाण, गणेश चव्हाण, भारती चव्हाण, भोला वांजळे, बापूसाहेब गायकवाड, डॉ. नितीन भालेराव, श्रीरंग पवार, प्राजक्ता हरपळे – भोसले, अरविंद पेठकर, अमर जाधव आदी उपस्थित ( Pune) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.