BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पुण्यातून पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी

बारामतीमधून रासपच्या कांचन कुल यांना उमेदवारी

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना पक्षाने तिकीट नाकारले आहे. त्याचप्रमाणे बारामती मतदारसंघातून भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. कुल या रासपचे आमदार राहूल कुल यांच्या पत्नी आहेत. बारामतीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध कुल असा दुहेरी सामना रंगणार आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
.