Pune : मतमोजणीपूर्वीच गिरीश बापट यांचा खासदार म्हणून फ्लेक्स!

एमपीसी न्यूज – देशभरात लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली असून मतमोजणीला काही तास शिल्लक राहिले आहे. मात्र, याच दरम्यान पुण्यातून भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट आणि आघाडीकडून मोहन जोशी हे निवडणूक लढवित आहे. तर, याच गिरीश बापट यांचा पुणे शहरात खासदार म्हणून फ्लेक्स लागल्याने शहरभर चर्चा सुरू झाली आहे.

देशभरात यंदा सात टप्प्यात निवडणूक पार पडली. तर या निवडणुकी दरम्यान भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्याकडून एकमेकावर आरोप प्रत्यारोप होताना पहावयास मिळाले. तसेच यंदा पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीकडे भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी प्रतिष्ठेची केली.

  • या मतदारसंघातून भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट आणि आघाडीकडून अनेक नेत्यांच्या नावाची चर्चा झाल्यानंतर अखेर मोहन जोशी यांना संधी देण्यात आली. या निवडणूकीच्या कालावधीत दोघांकडून मीच मताधिक्याने निवडून येणार असे प्रत्येक भाषणातून पहावयास मिळाले.

प्रचार, मतदान प्रक्रिया देखील झाली असून आता उद्या म्हणजे गुरुवारी मतमोजणीला सुरुवात होईल. या मतमोजणीला काही तास शिल्लक राहिले असताना पुण्यात एका रक्तदान शिबिराचा लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर गिरीश बापट यांचा खासदार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्या फ्लेक्सवरून शहरातील सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.