_MPC_DIR_MPU_III

Pune : चंद्रकांत पाटील यांना निवडून आणून गिरीश बापट यांनी निभावली ‘विशेष जबाबदारी’

एमपीसी न्यूज – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघातून निवडून आणण्याची ‘विशेष जबाबदारी’ खासदार गिरीश बापट यांच्यावर टाकण्यात आली होती. हि ‘विशेष जबाबदारी’ बापट यांनी पार पाडली आहे.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

यासाठी बापट यांनीही कोथरूड – कर्वेनगर, बाणेर – बालेवाडीमधील नगरसेवकांना ‘तोंडाला फेस’ येईपर्यंत पळविले. त्यामुळेच पाटील यांचा 25 हजार मतांनी विजयी झाल्याचे बोलले जात आहे. पण, हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघांतील पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. हे 2 मतदारसंघ ‘डेंजर झोन’मध्ये होतेच. शेवटच्या क्षणापर्यंत भाजपने हे उमेदवार विजयी होण्यासाठी प्रयत्न केले. पण, त्यात त्यांना यश आले नाही.

कोथरुडकरांनी दिलेल्या जनादेशाबद्दल सर्व जनतेचे मानले आभार!
मी शब्द देतो की, कोथरुडकरांच्या उत्कर्षासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करेन, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.