BNR-HDR-TOP-Mobile

Pune: प्रचंड मताधिक्याने निवडून येणार – गिरीश बापट

एमपीसी न्यूज – चारही पक्ष आमच्या बरोबर असून पुणे लोकसभा मतदार संघातील निवडणूक आम्ही प्रचंड मतधिक्‍याने जिंकणार आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला सर्वप्रथम मी धन्यवाद देतो. त्यांनी मला पुणे लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. त्याचप्रमाणे आरपीआय, शिवसंग्राम आणि शिवसेनेच्या नेत्यांना सुद्धा धन्यवाद देतो. पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रात आमची युती आहे. पुण्यामध्ये आम्ही एकत्रित काम करणार आहोत. निवडणूकीच्या राजकारणात प्रत्येक मतदार संघातून एकच उमेदवार असतो. पक्षामध्ये अनेक सक्षम उमेदवार असतात. त्यातून एकाची निवड करावी लागते.

एकाची निवड केली म्हणजे इतर उमेदवार सक्षम नाही. असा अर्थ कोणी काढू नये, शेवटी एकच जागा असल्याने हा निर्णय घ्यावा लागतो. पुणे शहरातून योगेश गोगावले, अनिल शिरोळे, मुरलीधर मोहोळ आणि संजय काकडे हे सर्व उमेदवारी मागत होते. हे सगळे सक्षम उमेदवार होते. गुणवत्तेच्या आणि मेरिट वर पक्ष नेतृत्व निवड करतो. आणि त्यातून माझी निवड केली आहे, असेही ते म्हणाले.

लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत कुठलेही भाविनक राजकारण नाही. मी महापालिका निवडणूक लढविली आहे. तीन वेळा नगरसेवक म्हणून काम केले आहे. पाच वेळा विधानसभेत काम केले आहे. या काळात अनेक कामे केली आहे. एक कार्यकर्ता म्हणून संसदेच्या कार्याचा ही अनूभव यावा ही इच्छा होती. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक मोठ्या योजना शहरात राबविण्यात येत आहेत. त्यांचा एकत्रित समतोल राहवा हाच एक हेतू आहे. मी कोणाकडे तिकिट मागण्यासाठी गेलो नाही की मी मुंबई व दिल्लीला वा-या सुद्धा केल्या नाहीत, आम्ही तिकिटासाठी अर्ज करत नाही. आमचे पक्ष नेतृत्व सक्षम आहे ते योग्य माणसांची निवड करते, असेही ते म्हणाले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3