Pune : गिरीश बापट यांचा दणदणीत विजय

एमपीसी न्यूज- पुण्यात भारतीय जनता पक्षाचे गिरीश बापट यांनी काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचा तब्बल 3 लाख 24 हजार 965  इतक्या मोठय़ा मताधिक्याने पराभव करत ऐतिहासिक विजय मिळविला. काँग्रेसचे मोहन जोशी यांना तीन लाख दोन हजार 434 मते मिळाली. या निवडणुकीमध्ये बापट यांचाच विजय होणार याबाबत मतदारांच्या मनात खात्री होती फक्त बापट किती मतांनी विजयी होणार याची उत्सुकता लागली होती.

बापट यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली ती शेवटपर्यंत राहिली. कसबा, पर्वती, कोथरूड, शिवाजीनगर या बहजपाचा प्रभाव असलेल्या मतदार संघांबरोबरच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असलेल्या वडगावशेरी आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघातही बापट यांनी मोहन जोशी यांच्यावर मात केल्याचे पाहायला मिळाले. दहाव्या फेरीनंतर बापट यांच्या मतांच्या आघाडीने लाखांचा टप्पा ओलांडला आणि बापट यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. वंचित विकास बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांनी पहिल्या तीन फेरीमध्ये 9 हजार मते मिळवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.