BNR-HDR-TOP-Mobile

Pune : महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावाच्या विकासासाठी 100 कोटी द्या-सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज – पुणे शहरात समाविष्ट झालेल्या 11 गावाचा विकास करण्यात हे सरकार अपयशी ठरले असून सध्या गावाची परिस्थिती लक्षात घेता, या गावाच्या विकासासाठी पुणे महापालिकेने शंभर कोटी रुपये द्यावे. अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलना दरम्यान केली.

पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या अकरा गावाच्या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात समाविष्ट गावातील लोकप्रतिनिधी आणि नागरिक सहभागी झाले होते. यावेळी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्य सरकारने पुणे शहराच्या लागतच अकरा गावे समाविष्ट करून दोन वर्षाचा कालावधी झाला. मात्र अद्याप पर्यंत त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची विकास कामे करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. त्यांचा फटका सर्व सामान्य नागरिकांना बसला असून या आंदोलनाची दखल सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाने न घेतल्यास भविष्यात आणखी तीव्र लढा उभारला जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3