BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पुणे लोकसभेसाठी निष्ठावान कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्यावी

शहरातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे निवेदन

659
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पुण्याला ऐतिहासिक, राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवारही तसाच योग्य आणि लोकांना भावणारा असला पाहिजे. लोकसभा निवडणुकीत पुण्यासाठी उमेदवार देताना काॅंग्रेस पक्षाने ‘विनिंग कँडिडेट’बरोबरच निष्ठावान कार्यकर्त्याचा विचार करावा. काँग्रेस श्रेष्ठींनी दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही सगळे एकजुटीने उभे राहून काम करू, अशा विनंतीचे पत्र पुण्यातील काँग्रेस नेत्यांनी पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठवले आहे.

ज्येष्ठ नेते उल्हास पवार, गोपाळ तिवारी आणि बाळासाहेब शिवरकर यांनी एकत्र येऊन पक्षाध्यक्ष राहूल गांधी, ज्येष्ठ नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी, मल्लीकार्जून खर्गे, वेणूगोपाल व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि इतर श्रेष्ठींना पुण्याच्या ऊमेदवारीबाबत विनंतीपत्र, निवेदन दिले आहे. ‘काॅंग्रेस पक्षाच्या ऊमेदवारी’विषयी अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याने, माध्यमातून उलटसुलट चर्चा होत आहेत. परिणामी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था होत असून, निष्कारण पक्षास मारक वातावरण तयार करण्याचा काही वृत्तींकडून प्रयत्न होत आहे.

  • देशांतर्गत परिस्थिती आणि या लोकसभेच्या निवडणुकीचे महत्व आणि गांभीर्य ओळखून कोणीही व्यक्तीगत महात्वाकांक्षेस प्राधान्य न देता ‘काॅंग्रेसची देशहीताची बांधीलकी’ डोळ्यासमोर ठेवून काॅंग्रेस ऊमेदवारासाठी कार्यकर्ते अथक प्रयत्न करतील. तसेच पक्ष देईल त्या ऊमेदवाराचे काम एकजुटीने करतील, असा विश्वासही या पत्राद्वारे गोपाळ तिवारी आणि नेत्यांनी केला आहे.
.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3