BNR-HDR-TOP-Mobile

Pune : कोंढवा दुर्घटनेतील दोषी व्यक्तींवर कारवाई झाली पाहिजे- सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज- कोंढवा दुर्घटनेतील दोषी व्यक्तींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून केली आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, कोंढवा दुर्घटनेमुळे सुरक्षेचा मुद्दा किती गंभीर आहे हे समोर आले आहे. सरकारला बांधकामावर राबणाऱ्या जीवाचे मोल नाही का ? नगरविकास खात्याने देखील बांधकाम व्यावसायिक व कामगार पुरवणारे ठेकेदार यांच्यावर कामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षितता पुरवण्याची जबाबदारी निश्चित करावी. त्याची कठोर अमलबजावणी होते की नाही ते सरकारने पाहावे अशी सूचना केली. त्याचप्रमाणे कोंढवा दुर्घटनेप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उद्देशून केली आहे.

HB_POST_END_FTR-A2

.