Pune : पूरग्रस्तांना ‘एसआरए’ची घरे द्या; केवळ चर्चा नको, ठोस निर्णय हवा -दीपक मानकर

एमपीसी न्यूज – महापूरग्रस्तांना अडीच महिन्यांपासून मदत मिळाली नाही. या लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यांना आज महापालिकेच्या शाळेत राहावे लागते, हे चित्र बरोबर नाही. पुणे शहरात ‘एसआरए’चे पाच-पाच हजार फ्लॅट बंद पडून आहेत. हे फ्लॅट तातडीने महापूरग्रस्तांना देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक दीपक मानकर यांनी केली. महापालिका सर्वसाधारण सभेत आज सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. त्याचा धागा पकडत मानकर यांनी प्रशासनासमोर अनेक सवाल उपस्थित केले.

आगामी काळात पुराची वाट बघत बसू नका. टांगेवला कॉलनीत बांधकाम व्यावसायिकाच्या हलगर्जीपणामूळे लोकांचा मृत्यू झाला. प्रशासन नेमके काय करते? पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी काय करतात? लोकांना टँकरने पाणीपुरवठा होत नाही.

पुणेकरांची जबाबदारी ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची आहे. माझ्या प्रभागात 35 फ्लॅट शिल्लक आहेत. त्या ठिकाणी पूरग्रस्तांची सोय होऊ शकते, असेही मानकर यांनी निक्षून सांगितले. तर, कोल्हापूर जिल्ह्यात गावांना पुराचा फटका बसला. अशी परिस्थिती पुण्यात पुन्हा होऊ नये, यासाठी आम्हाला नुसत्या चर्चा नको, ठोस निर्णय व्हावा. त्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.