Pune : संजय राऊत यांना झेड प्लस सुरक्षा द्या – सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज : खासदार संजय राऊत हे देशाचे नेते (Pune) असून त्यांना मारण्याची धमकी आली आहे. त्या प्रकरणी देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालून संजय राऊत यांना झेड प्लस सेक्युरीटी द्यावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

ठाकरे गटाचे नेते राज्यसभा खासदार संजय राऊत यांना हिंदू विरोधी, मार डालूंगा तुझे दिल्ली में मिल, एके 47 से उडा दूंगा मूसेवाला टाईप, लॉरेन्स की ओरसे ये मेसेज है समझ ले असा धमकीचा मेसेज संजय राऊत यांच्या मोबाईलवर आला आहे.

Sangvi : महादेव मंदिरासमोर तीन महिलांचे दागिने पळवले

त्यावरून सत्ताधारी (Pune) आणि विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोपच्या फेरी सुरू झाल्या आहेत. तर, त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे पुणे दौर्‍यावर होत्या. त्यावेळी संजय राऊत यांना धमकीचा मेसेज आला आहे. त्यावर त्यांनी भूमिका मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.