Pune : ‘कोकण विकासाचे व्हिजन डॉक्युमेंट, आराखडा करावा’

'जगातील अर्थसत्तेचा केंद्रबिंदू : कोकण 'परिसंवादाला चांगला प्रतिसाद

एमपीसी न्यूज- मुंबईचा केंद्रबिंदू कोकणाकडे सरकत असल्याने कोकण विकास सुनियोजित होण्यासाठी कोकण विकासाचे, कोकण विभागाचे व्हिजन डॉक्युमेंट, विकास आराखडा आणि विभागीय आराखडा (रिजनल प्लॅन) तयार करावा, त्या प्रक्रियेत तज्ज्ञांना समजून घ्यावे, असा सूर ‘जगातील अर्थसत्तेचा केंद्रबिंदू : कोकण ‘ परिसंवादात उमटला.

ग्लोबल कोकण फेस्टिवलच्या पूर्वसंध्येला ‘जागतिक अर्थसत्तेचा केंद्रबिंदू भारत, भारतीय अर्थसत्तेचा केंद्रबिंदू कोकण ‘ या परिसंवादात अनेक अपेक्षा व्यक्त झाल्या.

अध्यक्षस्थानी ‘ग्लोबल कोकण फेस्टिवल’चे अध्यक्ष संजय यादवराव होते. या परिसंवादात नवी मुंबई, सिडकोचे नगररचनाकार दिनकर सामंत, वसई -विरारचे पहिले महापौर राजीव पाटील, अमेरिकेतून खास महोत्सवाला आलेले उद्योजक ललित महाडेश्वर, संजय यादवराव, उद्योजक किशोर धारिया अनेक मान्यवर यांनी सहभाग घेतला.

दिनकर सामंत म्हणाले, “बंदरे, रस्ते, विमानतळ, रेल्वे ने कोकण जोडले जात आहे. खनिजे, निसर्ग, शेती, पर्यटन, वारसा याने कोकण समृद्ध आहे. मगर नगर रचनाशास्त्राच्या दृष्टीने सुनियोजित विकास झाला पाहिजे. रोजगार, पर्यटन वाढवले पाहिजे. विस्थापन रोखले पाहिजे”

संजय यादवराव म्हणाले,”भारत महासत्ता होताना, मुंबई- कोकण चे महत्व वाढत आहे. विकासाचा केंद्रबिंदू कोकणात सरकत आहे. आता चाकरमानी मानसिकतेतून कोकण वासियांना बाहेर काढून उद्योजकतेकडे नेले पाहिजे. ग्लोबल कोकण त्यासाठी व्यासपीठ उभे करेल”

वसई -विरार चे पहिले महापौर राजीव पाटील म्हणाले, “नैसर्गिक साधन संपत्ती जपून पर्यटन वाढवले पाहिजे. कोकणच्या खादयसंस्कृतीला उत्तेजन द्यावे. एकाच प्रकारचा उद्योग सर्वांनी करण्यापेक्षा वैविध्यपूर्ण व्यवसाय करावे”

अमेरिकास्थित उद्योजक ललीत महाडेश्वर म्हणाले,” सिलिकॉन व्हॅली, बोस्टन सिंगापूर , दुबई प्रमाणे मुंबई – कोकण पट्टा अर्थसत्तेचे केंद्र व्हावे, हे सुंदर स्वप्न आहे. त्यासाठी वेगवेगळी उत्पादने- सेवा उद्योग तयार झाले पाहिजेत. संपत्ती निर्मितीसाठी बौद्धिक क्षमता वृद्धिंगत केल्या पाहिजेत”

धारिया म्हणाले, “कोकणाकडे रिव्हर्स मायग्रेशन ‘ झाले पाहिजे. त्यासाठी पुण्यातील जनरेशन नेक्स्टने पुढाकार घ्यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.