Pune : कोथरूड, कर्वेनगर, प्रभात रस्ता भागातील ज्येष्ठांना मिळणार घरपोच किराणा व औषधे 

ज्येष्ठ नागरिकांसाठी‘गोखले कन्स्ट्रक्शन्स’चा मदतीचा हात 

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या देशभरातील लॉकडाऊनच्या परिस्थितीत ‘गोखले कन्स्ट्रक्शन्स’च्या वतीने शहरातील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. या अंतर्गत शहराच्या प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, कर्वेनगर, पटवर्धन बाग, मयुर, आयडियल, डहाणूकर, रामबाग कॉलनी या भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष हेल्पलाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. 

या हेल्पलाईनवर संपर्क केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक किराणामाल व अत्यावश्यक औषधे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सेवा ज्येष्ठ नागरिकांना मोफत व घरपोच मिळणार आहे. या सेवेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.
ही सेवा हवी असल्यास नागरिकांनी सकाळी 10 ते दुपारी 12 आणि सायं. 4 ते सायं. 6 या वेळेत खाली नमूद संपर्क क्रमांकावर साधावा असे आवाहन ‘गोखले कन्स्ट्रक्शन्स’तर्फे करण्यात आले आहे.
या परिस्थितीत आपण सर्वजण एकमेकांना खंबीर साथ देण्याची गरज असून त्या दृष्टीने आपण हे प्रयत्न करीत असल्याचे या वेळी ‘गोखले कन्स्ट्रक्शन्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले यांनी कळविले आहे.

 

गोखले कन्स्ट्रक्शन्स करीत असलेले हे काम कौतुकास्पद असल्याचे सांगत पुणे महापालिकेने देखील यासाठी आवश्यक त्या परवानगी दिली आहे.

 

विभागानुसार संपर्क करण्याचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे –
प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता – महेश : +91 95521 05109
कर्वेनगर, पटवर्धन बाग – अमोल : +91 73504 98999
मयुर, आयडियल, डहाणूकर, रामबाग कॉलनी- योगेश : +91 97620 77001

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.