BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 1 कोटी 29 लाख किंमतीची सोन्याची बिस्किटे जप्त

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- दुबईहून आलेल्या विमानाच्या स्वच्छतागृहात तब्बल 1 कोटी 29 लाख 4 हजार रुपये किमतीची 4 हजार ग्रॅम वजनाची 4 सोन्याची बिस्किटे कस्टमच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली. ही कारवाई आज, गुरुवारी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे साडेचारच्या सुमारास स्पाइस जेट कंपनीच्या विमानात करण्यात आली.

कस्टम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे दुबईहून आलेल्या स्पाइस जेट कंपनीच्या विमानाच्या स्वच्छतागृहात एका काळ्या रंगाच्या चिकटपट्टीमध्ये गुंडाळून ठेवलेली 4 सोन्याची बिस्किटे आढळून आली. या बिस्किटावर आंतरराष्ट्रीय रिफायनरीचा शिक्का असून त्यावर सिरीयल नंबर देखील आहेत.

या कारवाईत कस्टम अधिकारी देशराज मीना, सहआयुक्त राजेश रामराव, उपायुक्त हर्षल मेटे, अधीक्षक सुधा अय्यर, संजय झरेकर, सतीश सांगळे, राजेंद्रप्रसाद मीना आदींनी सहभाग घेतला.

HB_POST_END_FTR-A4

.