Pune : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ८१ लाख रुपयांच्या सोन्याची तस्करी; महिला अटकेत

एमपीसी न्यूज – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे ८१ लाख ७५ हजार ३२ रुपयांचे तस्करीचे सोनं सीमा शुल्क विभागाने पकडले आहे.
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिलेकडून तब्बल तीन किलो सोने जप्त केलं आहे.

बेबी शिवजी वाघ असे सोन्याची तस्करी करणाऱ्या महिलेचे नाव आहे. ही महिला आज एअर इंडीयाच्या विमानाने पुणे अंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाली.

सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना तिचा संशय आल्याने तिच्याजवळील साहित्याची तपासणी केली असता तिच्या जवळील चार प्लास्टिक बॅगमध्ये ३ किलो २८० ग्रॅम वजनाचे सोने सापडले. सोन्याची पेस्ट करुन हे सोनं प्लॅस्टीक पिशवीतून आणले होते. तिने हे सोनं बाहेरच्या देशातून आणल्याचा संशय सीमाशुल्क अधिकाऱ्यांना असून तिच्याकडे याबाबत चौकशी सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.