Pune : गोल्डमॅन सम्राट मोझे यांचे निधन

एमपीसी न्यूज – पुणे शहरात प्रसिद्ध असलेले गोल्डमॅन आणि उद्योजक सम्राट मोझे यांचे खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते, मित्र परिवाराला प्रचंड धक्का बसला आहे.

मागील आठवड्यात मोझे यांनी आपला ३९ वा वाढदिवस साजरा केला होता. ते दररोज अंगावर साधारण साडेआठ किलो सोनं घालत होते. मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचा सोनं घालण्याचा विक्रमही मोझे यांनी मोडला असल्याची चर्चा होती.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे महापालिका निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी मुलाखतही दिली होती. संगमवाडी प्रभाग क्र. 1 मधून ते निवडणूक लढवणार होते.

त्यांचे चुलते व माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्याकडून त्यांना राजकीय वारसा लाभला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून आपली बदनामी होत असल्याची तक्रार सम्राट मोझे यांनी पोलिसांच्या सायबर सेलला दिली होती.

मोझे यांनी आपले लहानपण चिंचवड गावात व्यतीत केले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चिंचवडच्या चापेकर शाळेत झाले. त्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.