Pune : गूड न्यूज ! 100 वर्षीय आजीचा कोरोनावर विजय

Good news ! 100 year old grandmother wins over Corona : वयाची 100 असतानाही त्यांनी उपचारांना प्रतिसाद देत कोरोनाला हरवले.

एमपीसी न्यूज – एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. अशीच आशादायक बातमी समोर आली आहे. विमाननगर येथील कोविड केअर सेंटरमध्ये 100 वर्षीय कोरोनाबाधित आजींवर यशस्वीपणे उपचार करण्यात आले. आता या आजींनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

वयाची 100 असतानाही त्यांनी उपचारांना प्रतिसाद देत कोरोनाला हरवले. त्यामुळे या आजींवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स-टीमचे अभिनंदन करीत असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

बोराटेनगर येथील आजी बाई दराडे (वय100), त्यांचे जावई हरीशचंद्र घुगे (वय 63), केशरबाई घुगे (वय 60), मुलगी माधुरी दराडे (वय 38), यशोधन दराडे (वय 16) आणि सानिया दराडे (वय 14) अशा एकाच कुटुंबातील सहा जणांना करोनाची बाधा झाली होती.

या कुटुंबातील चौघे करोनामुक्त झाले, तर केशरबाई घुगे व त्यांची मुलगी माधुरी दराडे या दोघींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या आजी वयाच्या 100 व्या वर्षी कोरोनावर मात केली आहे.

डॉक्टरांनी लिक्विडद्वारे आजीला जेवण देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही दिवसांतच आजीच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. आजीला इतर कोणत्याही प्रकारचा आजार नाही. या आजीने इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर विजय मिळवला.

कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन आजींच्या नातेवाईकांतर्फे करण्यात आले आहे.

त्यामुळे कोरोना झाला म्हणून घाबरण्याचे काहीही कारण नाही. या आजारातून बरे होता येते, हे या आजींनी दाखवून दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.