Pune : खुशखबर ! इयत्ता दहावीचा उद्या ऑनलाईन निकाल

Good News ! Class X results online tomorrow

एमपीसीन्यूज : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या ( बुधवारी) दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.

याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने देण्यात आली.

हा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार जाहीर केला जात असल्याचे कळवण्यात आले आहे.
मुंबई,  पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, लातूर, नाशिक, कोल्हापूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.29) जुलै रोजी दुपारी 1 वाजता अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर होणार आहे.
_MPC_DIR_MPU_II
* येथे पहा निकाल 
  शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.inmahresult.nic.in वर निकाल पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1