Pune : टपाल तिकीट संग्रहकांसाठी खुशखबर..बालगंधर्व कलादालनात जिल्हास्तरीय टपाल तिकिटांचे भरणार प्रदर्शन

एमपीसी न्यूज – भारतीय टपाल विभागाने टपाल तिकीट संग्रहकांसाठी जिल्हास्तरीय ( Pune) टपाल तिकिटांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. बालगंधर्व कलादालनात हे प्रदर्शन 6 ते 7 डिसेंबरला होणार आहे. यात विशेष टपाल पाकिट तसेच ‘पिक्चर पोस्ट कार्ड’चे अनावरण करण्यात येणार आहे. लहान मुलांसाठी वयोगटानुसार टपाल तिकीट डिझाईन, पत्रलेखन, रांगोळी व प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती टपाल विभागाने पत्रकाद्वारे दिली.

या प्रदर्शनामुळे ‘फिलाटेली’चा (टपाल तिकिटांचा संग्रह) छंद जोपासण्याची संधी पुणेकरांना विशेषतः लहान मुलांना मिळणार आहे. प्रदर्शनस्थळी विविध फिलाटेली तिकीट विक्रीसाठी तसेच स्वतःचे टपाल तिकीट ( Pune) तयार करून घेण्यासाठी ‘माय स्टॅम्प’ कक्ष सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती पुणे क्षेत्राचे पोस्ट मास्टर जनरल आर. के. जायभाये यांनी दिली.

Today’s Horoscope 20 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

या स्पर्धेत 10  ते 15 वयोगटातील विद्यार्थी,16 ते 21 वयोगटातील तरुण आणि 21 वर्षांवरील प्रौढ अशा तीन प्रकारांत सहभागी झालेल्यांपैकी प्रत्येक विभागातील तीन विजेते राज्यस्तरीय टपाल तिकीट प्रदर्शनात सहभाग घेऊ शकतील. त्यासाठी येत्या शुक्रवारपर्यंत (दि. 24 ) इच्छुकांनी प्रवेशिका पाठवाव्यात, असे आवाहन केले आहे.

प्रवेशिका येथे उपलब्ध
इच्छुकांनी स्पर्धेसाठी प्रवर अधीक्षक डाकघर, पुणे शहर पश्चिम विभाग, लोकमान्यनगर, पुणे- ४११०३० या पत्यावर प्रवेशिका पाठवाव्यात. या प्रवेशिका कॅम्प आणि बेलबाग चौकातील पुणे शहर मुख्य डाकघर, शिवाजीनगर, पर्वती तसेच एस. पी. कॉलेज येथील टपाल कार्यालयात उपलब्ध ( Pune) असतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.