Pune : आनंदाची बातमी ! महापौरांची कोरोनावर मात

Good news! The mayor defeated Corona :15 जुलैपर्यंत त्यांना 'होम क्वारंटाईन' राहण्याची सूचना डॉक्टरांनी केली आहे

एमपीसी न्यूज – समस्त पुणेकरांसाठी ‘गुड न्यूज’ आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने महापौरांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, येत्या 15 जुलैपर्यंत त्यांना ‘होम क्वारंटाईन’ राहण्याची सूचना डॉक्टरांनी केली आहे.

दरम्यान, कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि टीमचे धन्यवाद मानत असल्याचे महापौरांनी सांगितले. होम क्वारंटाईननंतर पुन्हा एकदा 24 तास पुणेकरांच्या सेवेसाठी उपलब्ध असेल, याचं नक्कीच समाधान आहे, असा विश्वासही महापौरांनी ट्विट करून व्यक्त केला.

महापौरांना कोरोना झाल्याची माहिती त्यांनी स्वतःच ट्विट करून दिली होती. त्यानंतर पुणेकरांनी महापौरांना तातडीने बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून महापौर मोहोळ फिल्डवर रात्री उशिरापर्यंत काम करीत होते.

त्यांच्या या कामाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट यांनीही कौतुक केले होते.

कोरोना झाला म्हणून काहीही घाबरण्याचे कारण नाही. योग्य वेळी उपचार घेतले तर कोरोनासुद्धा बरा होऊ शकतो, हे महापौरांनी सुद्धा दाखवून दिले आहे.

दरम्यान, पुणे शहरात कोरोनाचे 24 हजार 168 रुग्ण झाले आहेत. आतापर्यंत 14 हजार 998 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. 8 हजार 400 ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.