Pune : कोरोनाबद्दल जनजागृती साठी गुगल चे खास डुडल

एमपीसी न्यूज – हंगेरियन फिजिशियन व शास्त्रज्ञ इग्नाझ सेमेलवाईस यांच्या माध्यमातून योग्य पद्धतीने हात धुण्याच्या सवयीबद्दलचा व्हिडिओ गुगलच्या होम पेजवर देण्यात आला आहे. यामध्ये हात धुत असताना हाताचा तळवा, अंगठा, बोटांच्या मध्ये, हाताची मागील बाजू व मनगट धुण्याबद्दल योग्य मार्गदर्शन करण्यात आले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गुगलने सुद्धा याची दाखल घेतली असून नागरिकांना पाच सवयींचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये हात वारंवार धुतले पाहिजेत, खोकताना किंवा शिंकताना हाताच्या कोपरा आडवा धरायला हवा, तोंडाला सारखा स्पर्श करू नका, इतरांपासून किमान 3 फुटांचे अंतर ठेवा व आजारी असल्याचे जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, असा सल्ला गुगल होम पेजवर  देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.