Pune : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश प्रवक्तेपदी गोपाळ तिवारी यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीच्या ‘प्रवक्ते’पदी ज्येष्ठ काॅंग्रेस कार्यकर्ते, अखिल भारतीय काॅंग्रेस कमिटीचे माजी सदस्य व माजी नगरसेवक गोपाळ तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तिवारी यांच्या नियुक्तीचे पत्र टिळक भवन, मुंबई येथे दिले.

गोपाळ तिवारी हे अभ्यासू, कार्यक्षम व निष्ठावान कार्यकर्ते असून, ते गेल्या काही महीन्यांपासून माध्यमांमध्ये पक्षाची बाजू समर्थपणे मांडत असून चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. त्यांच्या कार्याला अधिक वाव मिळावा, तसेच पक्षाची बाज़ू अधिक सक्षमतेने मांडता यावी, या हेतूने त्यांना ‘प्रदेश काॅंग्रेस प्रवक्ते’पदी नियुक्ती केल्याचे थोरात यांनी म्हटले आहे.

प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याबद्दल गोपाळ तिवारी यांनी आनंद व्यक्त केला असून, ‘प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू. तसेच पक्षाच्या आणि नेत्यांच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षांना खरे ऊतरण्याचा कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे गोपाळ तिवारी यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.