Pune : थंड पाण्याचे जार निर्मितीतील बेकायदेशीर उद्योगांची माहिती संकलित करण्याचे शासनाचे आदेश

Government orders to collect information on illegal industries in cold water jar manufacturing

एमपीसी न्यूज – शासनाच्या आवश्यक परवानग्या नसताना थंड पाण्याच्या जारची निर्मिती-विक्री करणाऱ्या थंड पाण्याचे जार निर्मिती क्षेत्रातील,महाराष्ट्रातील बेकायदेशीर उद्योगांची (चिल्ड वॉटर जार युनिट्स )माहिती संकलित करण्याचे आदेश  राज्य शासनाने राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायती आणि महानगरपालिकांना दिले आहेत. 

नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे उपसंचालक भालचंद्र बेहेरे यांनी हा शासकीय आदेश बुधवारी (दि.22) रोजी काढला आहे.

_MPC_DIR_MPU_II

विजयसिंह डुबल यांनी यासंदर्भात राष्ट्रीय हरित प्राधिकरणात बेकायदेशीररित्या पाणी निर्मिती करणारे असे उद्योग बंद करावेत अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. 19 जुन रोजी याबाबतचा आदेश प्राधिकरणाने दिला आहे. त्याला अनुसरून  राज्य शासनाने बेकायदेशीर पाणी निर्मिती उद्योगांची माहिती संकलित करण्याचा शासकीय आदेश काढला आहे.

विजयसिंह डुबल यांनी आज (शुक्रवारी) पुण्यात पत्रकाद्वारे ही माहिती दिली. डुबल यांच्या वतीने अ‍ॅड.असीम सरोदे यांनी राष्ट्रीय हरित प्राधिकरणात काम पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.