Pune graduate constituency : पुणे पदवीधर मतदार संघात दुपारी दोन पर्यंत 37.10 टक्के मतदान

एमपीसी न्यूज – पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. सकाळी दहा वाजेपर्यंत पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये 8.52 टक्के मतदान झाले. त्यानंतरच्या दोन तासात (दहा ते बारा) 10.92 टक्के मतदान झाले.

चार तासात एकूण 19.44 टक्के मतदान झाले. नंतरच्या दोन तासात (दुपारी 12 ते 2) 17.66 टक्के मतदान झाले असून दुपारी दोन पर्यंत 37.10 टक्के मतदान झाले.

पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. पाच जिल्ह्यात 2 लाख 91 हजार 371 पुरुष तर 1 लाख 34 हजार 854 महिला मतदार आहेत. त्याचबरोबर 32 तृतीयपंथी पदवीधर मतदार आहेत. यातील 1 लाख 19 हजार 710 पुरुष तर 38 हजार 425 महिला मतदारांनी दुपारी दोन वाजेपर्यंत मतदान केले आहे. एकूण 4 लाख 28 हजार 257 पदवीधर मतदारांपैकी 1 लाख 58 हजार 135 पदवीधर मतदारांनी दोन वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे.

दुपारी दोन वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले. तर पुणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदान झाले आहे. एकूण 37.10 टक्के मतदान झाले आहे.

जिल्हावार झालेले मतदान –
पुणे (एकूण – 2 वाजेपर्यंत झालेले मतदान)
पुरुष – 89626 – 33851
महिला – 46958 – 11230
तृतीयपंथी – 27 – 0
एकूण – 136611 – 45081 (33.00 टक्के)

सातारा (एकूण – 2 वाजेपर्यंत झालेले मतदान)
पुरुष – 39397 – 15394
महिला – 19673 – 5199
तृतीयपंथी – 1 – 0
एकूण – 59071 – 20593 (34.86 टक्के)

सांगली (एकूण – 2 वाजेपर्यंत झालेले मतदान)
पुरुष – 57569 – 22904
महिला – 29661 – 9097
तृतीयपंथी – 3 – 0
एकूण – 87233 – 32001 (36.68 टक्के)

सोलापूर (एकूण – 2 वाजेपर्यंत झालेले मतदान)
पुरुष – 42070 – 16765
महिला – 11742 – 3115
तृतीयपंथी – 1 – 0
एकूण – 53813 – 19880 (36.94 टक्के)

कोल्हापूर (एकूण – 2 वाजेपर्यंत झालेले मतदान)
पुरुष – 62709 – 30796
महिला – 26820 – 9784
तृतीयपंथी – 0 – 0
एकूण – 89529 – 40580 (45.33 टक्के)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.