Pune: घरावर गुढी उभारून पुणेकरांनी केला कोरोना विरुद्ध विजयाचा संकल्प!

एमपीसी न्यूज – घरावर गुढी उभारून पुणेकरांनी आज (बुधवार) कोरोना विरुद्ध विजयाचा संकल्प केला. घरातच राहून आज पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिक हिंदू नववर्ष दिनाचा सण आपल्या कुटुंबाबरोबर साजरा करताना दिसत आहेत.

पाडव्याचा सण हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी नवीन गृहखरेदी, नवीन वाहनखरेदी, सुवर्णखरेदी, नव्या वस्तूंची खरेदी, नवीन प्रकल्पांचा शुभारंभ, भूमिपूजन आदी कार्यक्रम असतात, मात्र यावेळी प्रथमच असा कोणताही कार्यक्रम नसल्याने हा पाडवा खूप सुनासुना वाटत आहे.

पाडवा म्हटलं की खरेदीचा मुहूर्त…., मात्र कोरोना नियंत्रणासाठी काल मध्यरात्रीपासून देशात लॉकडाऊन सुरू झाल्याने संपूर्ण शहरात संचारबंदीसारखी परिस्थिती आहे. पाडव्याच्या सणाला देखील बाजारपेठ व रस्ते ओस पडल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठी नववर्षारंभानिमित्त दरवर्षी निघणाऱ्या शोभायात्रा यंदा कोरोनाच्या संकटामुळे रद्द करण्यात आल्या आहेत.

अत्यावश्यक कामांसाठीच लोक घराबाहेर पडत असल्याने सणाची लगबग कोठेही पाहायला मिळत नाहीय.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.