Pune : ‘स्ट्रेस लिटरेट’ या विषयावर गुरुश्री SJ यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

एमपीसी न्यूज : फर्ग्युसन महाविद्यालय पुणे (Pune) येथे ‘स्ट्रेस लिटरेट’ या विषयावर एक कार्यशाळा 18 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत गुरुश्री एसजे (शंतनु जोशी) यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये विद्यार्थ्यांनासुद्धा विविध प्रकारच्या ताण-तणावांना सामोरे जावे लागते. गुरुश्री यांनी ‘ताण’ म्हणजे काय? तो कसा येतो? तो कसा जाणवतो? हे प्रश्न-उत्तरांच्या मदतीने अतिशय सोप्या पद्धतीने उलगडून दाखवले.

Chakan Tax : चाकणकरांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन अन्यायकारक करवाढीची तक्रार

ताणापासून मुक्त होण्यासाठी ‘ताणावर’ लक्ष केंद्रित न करता आपल्या मनावर काम करणे कसे गरजेचे आहे? हे वेगवेगळ्या उदाहरणांनी समजावून दिले. ‘मनाला’ योग्य सवयी लावण्यासाठी सजगते बरोबरच काही युक्त्यांचा कसा वापर करता येतो हे ही शिकवले. गुरुश्री यांचा मुलांशी सहज सोप्या भाषेतून संवाद आणि विषयाला अनुसरून दाखवलेले व्हिडिओ यामुळे सेशन अजून रंगतदार झाले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी रोज करता येईल असा एक ध्यानाचा प्रकार (meditation) विद्यार्थ्यांकडून करून घेतला. मनाला योग्य सवयी लावण्यासाठी आणि अभ्यासात सातत्य येण्यासाठी त्यांनी एक ‘auto mode setter’ (ट्रॅकर) विद्यार्थ्यांना दिला.

रोजच्या अभ्यासाहून वेगळा पण त्याच (Pune) अभ्यासाला पूरक असा एक अनुभव विद्यार्थ्यांना घेता. आला यासाठी विद्यार्थ्यांनी गुरुश्री यांचे आभार मानले. गुरुश्री यांनीही विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशा विषयावर सेशन आयोजित केल्यामुळे फर्ग्युसन महाविद्यालयाचे विशेष आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.