Pune: जिम ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर मांडल्या समस्या

लॉकडाउनमुळे जिमचे मालक, कर्मचारी आर्थिक संकटात आले आहेत. त्यामुळे सरकारने सक्तीचा लॉकडाउन रद्द करून लोकांना निर्णय घेऊ द्यावा अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

0

एमपीसी न्यूज – पुण्यातील महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज (दि.2) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. सततच्या लॉकडाऊनमुळे येणाऱ्या विविध अडचणींचे निवेदन त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिले.

महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनचे महेंद्र चव्हाण, कृष्णा भंडलकर,अमित वाघमारे यांनी हे निवेदन दिले.

देशात कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी 23 मार्च रोजी लॉकडाऊन लागू करण्यात आला. तेव्हापासून देशात जिम बंद ठेवण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने अनलॉक 2 नुसार 5 ऑगस्टपासून कंटेनमेंट झोन सोडून देशात जिम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राज्य सरकारने याबाबत अजून कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही.

दरम्यान, पुण्यातील महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन विविध समस्या मांडल्या. निरंतर लॉकडाउनमुळे जिमचे मालक, कर्मचारी आर्थिक संकटात आले आहेत. त्यामुळे सरकारने सक्तीचा लॉकडाउन रद्द करून लोकांना निर्णय घेऊ द्यावा अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like