BNR-HDR-TOP-Mobile

Pune : हडपसर येथे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; दोन परदेशी तरूणींची सुटका

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – हडपसर येथील एका सोसायटीमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या तिघांना पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले. या कारवाईत दोन परदेशी मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली. हडपसर, गंगानगर मधील साहील हाईट्स या सोसायटीमधील फ्लॅटवर ही कारवाई करण्यात आली.

नूर इस्लाम अंगूर शेख (नय 26, रा,पश्चिम बंगाल), मोहम्मद राबी शेख (वय 28, रा. बांग्लादेश), आल्लामिन जमीर शेख (वय 25, रा. बांग्लादेश) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील गंगानगरमधील साहील हाईट्स मधील एका फ्लॅटमध्ये इस्लाम शेख हा त्याच्या साथीदारांसह परदेशी मुलींना आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या फ्लॅटवर छापा टाकून दोन बांगलादेशीय सज्ञान मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका केली.

तसेच त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरूद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई दरम्यान 3 हजारांची रोकड, मोबाईल फोन, फ्लॅटच्या अॅग्रीमेंटची झेरॅाक्स कॅापी, आधार कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.